तुमच्या नोकरीशी व्यवस्थित जुळवून घेणं , हे अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून करणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीचे पहिले काही दिवस अतिशय महत्त्वाचे असतात , कारण त्यावेळीच तुमच्याबद्दल लोकं मत निर्माण करतात आणि या काही प्रथम दिवसांवरच तुमचं भवितव्य अवलंबून असतं.
पहिला संपूर्ण महिना तुमची नोकरी समजून घ्या. कोणतेही काम कळत नसल्यास इतर सहकाऱ्यांना किंवा तुमच्या लीडरला विचारा. प्रश्न असतील तर तेसुद्धा जरूर विचारा. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका.
तुमच्याकडे योग्य ते कौशल्य नाही , असे वाटत असले तरी ही रिस्क घ्यायला घाबरू नका. तुम्ही एखादं आव्हान स्वीकारल्याशिवाय नवीन स्किल्स शिकता येणार नाहीत. एखाद्या गोष्टीत निपुण व्हायला तुम्हाला कमीतकमी १० , ००० तास लागतील. पण कॉर्पोरेट आयुष्य खूप जलद असतं. त्यामुळे इतका वेळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही , हे लक्षात ठेवा. मात्र या जलद आयुष्यात अपयशाची भीती वाटून घेऊ नका.
निर्णय घ्यायला शिका. सुरुवातीला तुम्हाला मदत लागेल , पण नंतर मात्र स्वतः काम करा. मित्र बनवा. बरेचदा त्यांच्याकडून खूप मदत होते. तुमच्या कामामुळे कंपनीमध्ये नजरेत या. जरी तुमच्या कामामुळे ते शक्य नसेल , तरीसुद्धा काही अनौपचारिक संबंधसुद्धा असणं फायद्याचं ठरतं.
आणखी एक म्हणजे मित्रांसारखाच ऑफिसमध्ये एखादा मेंटॉरसुद्धा शोधा. एखादी यशस्वी आणि अनुभवी व्यक्ती ते काम करू शकते. नेहमीच लक्षात ठेवा की यशस्वी लोकांना त्यांच्यासारखेच इतर काही प्रोफेशनल्स तयार करण्याची इच्छा असते. त्यांना कोणीतरी मेंटॉर मानतं , यात त्यांना खूप आनंद असतो , त्यामुळे ते तुम्हाला पुरेपूर मदत करतात. ते करण्यायोग्य व्यक्तीला तुम्ही त्यांची मदत घेऊ इच्छिता , हे सांगायला अजिबात संकोच वाटून घेऊन नका.
' कॉर्पोरेट ' च्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या. एखादी जबाबदारी घ्या आणि ती नीट पार पाडा. तुम्ही स्वतःहून पुढे झालात की तुमच्यातील लीडर होण्याचे गुण दिसून येतात.
तुमच्या संवाद कौशल्यावर मेहनत घ्या. जगातलं सगळं ज्ञान असणं महत्त्वाचं नाही , पण जे तुम्हाला वाटतं ते लोकांपर्यंत गैरसमज न होता पोहोचवण्याची कला आली पाहिजे. ' स्टेज फियर ' घालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
ध्येयवादी राहा. जे रिस्क घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार नाहीत , अशा लोकांपासून लांब राहा. एखादे आव्हान स्वीकारा आणि ते पूर्ण करा. तुमच्याबद्दल तुमच्याच मनात आदर वाढेल. लहान लहान आव्हानांनी सुरुवात केलीत तर पुढे येणाऱ्या मोठ्या आव्हानांना अगदी आरामात सामोरं जाता येईल.
या सर्व वाटचालीत तुमच्यासमोर खूप आव्हाने येतील. नवीन गोष्टी कराव्या लागतील. काही वेळा तुम्हाला यश मिळेल तर काही वेळा अपयशी ठराल. पण तुमच्या यशाची गाथा लक्षात ठेवा , त्यातून प्रेरणा घ्या आणि पुढे चाला. हेतू चांगला असेल तर सगळ्या अडथळ्यांवर मात करता येईल.

No comments:
Post a Comment