Thursday, 15 August 2013

नैसर्गिक आपत्तींत आधार इन्शुरन्सचा

नैसर्गिक संकटाने मोठे नुकसान झाले की त्यासाठीच्या इन्शुरन्सचे महत्त्व लक्षात येते . अशा बिकट परिस्थितीमध्ये हे कवच खूपच मदत करते . मग ती मदत आपत्ती येण्यापूर्वी असो , आपत्तीदरम्यान असो वा आपत्तीनंतरच्या पुनर्वसनामध्ये होणारी असो .

भूकंप , पूर , वादळ , चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती प्रचंड हानी करून जातात . अशा संकटांपासून आपले , कुटुंबाचे संपत्तीचे रक्षण करण्यासाठी इन्शुरन्सचे पुरेसे संरक्षण घेणे गरजेचे आहे . अधिकाधिक लोकांनी याबाबत इन्शुरन्स काढला तर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानाचा सरकारवरचा बोजाही कमी होईल , असा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे .

नैसर्गिक आपत्तींसाठी प्रॉपर्टी इन्शुरन्सअंतर्गत इन्शुरन्स संरक्षण मिळवता येते . अनेक इन्शुरन्स योजना अशा आपत्तींपासून संरक्षण देतात . असे संरक्षण मूलतः त्यामध्ये अंतर्भूत असते किंवा त्यासाठी अतिरिक्त संरक्षण घेता येते . उदाहरणार्थ , ' स्टॅण्डर्ड फायर अॅण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी ' मध्ये वादळ , पूर , भूभाग पाण्याखाली जाणे , तुफान अशा आपत्तींसाठीचे संरक्षण अंतर्भूत आहे . भूकंपापासून संरक्षण हवे असल्यास ते अतिरिक्त घ्यावे लागते . सर्वसाधारण आपत्तींच्या तुलनेत अस्मानी संकटांचा प्रीमिअम अधिक असतो . कारण , अशा प्रकारच्या आपत्ती ओढावल्यास त्यापासून होणारे नुकसान भयंकर असते .

संपत्ती पुन्हा उभारायची झाल्यास लागणारा खर्च किंवा त्या बदल्यात दुसरी घ्यायची झाल्यास होणारा खर्च यावर इन्शुरन्स संरक्षणाचे मूल्य अवलंबून असते . अशा प्रकारच्या आपत्तींमुळे व्यापारात अडथळा आल्यास होणाऱ्या नुकसानाच्या अनुषंगानेही भरपाई करणाऱ्या इन्शुरन्स योजना उपलब्ध आहेत . या इन्शुरन्स योजनांच्या प्रीमिअमचे प्रमाण अनेक गोष्टींवर अवलंबून असते . उदा . विमासंरक्षण असणाऱ्या मालमत्तेची प्रत्यक्ष जागा , संरक्षणाचा आवाका , कामाचे स्वरूप . पूर्वीच्या क्लेमवरही प्रीमिअमचा दर अवलंबून असतो . सामान्यतः प्रॉपर्टी इन्शुरन्स पॉलिसीजअंतर्गत ' एक्सेस ' ही सक्तीची कपात केली जाते , ज्याचा उल्लेख पॉलिसी डॉक्युमेण्टमध्ये केला जातो त्यासाठी क्लेममधली ठराविक रक्कम कापली जाते . कोणतीही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी पुरेसा अभ्यास आवश्यक आहे . योजनेतील अंतर्भूत बाबी वगळलेल्या बाबींच्या विभागात , वगळलेल्या गोष्टी पॉलिसीत अंतर्भूत करून घ्यायच्या असतील तर इन्शुरन्स कंपनीशी बोलणी करा आणि अतिरिक्त प्रीमिअम भरून ती आपल्या पॉलिसीत अंतर्भूत करून घेता येते का पाहा . नैसर्गिक आपत्तींपासूनचे संरक्षण सर्वसाधारणतः अॅड - ऑन कव्हर असते , जे वगळलेले असते . अतिरिक्त प्रीमिअम भरून ते आपल्या पॉलिसीत अंतर्भूत करून घेता येते . सामान्यतः या कव्हरसाठी थांबावे लागत नाही , पण धोरणी इन्शुरन्स कंपनी अशा आपत्तींची पूर्वसूचना मिळाल्यास किंवा आपत्तीनंतर त्या कव्हर्सच्या उपलब्धतेवर मर्यादा घालू शकतात . इन्शुरन्स क्लेमसाठी नोंदणी केलेला काळ इन्शुरन्स क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा असतो . अस्मानी संकटामुळे नुकसान झाले असेल तर मदतीसाठी साधारणतः इन्शुरन्स कंपनीवरच अवलंबून राहता येते . पहिली पायरी म्हणून आपला क्लेम लेखी स्वरूपात सादर करावा लागतो . त्यामध्ये झालेल्या नुकसानाचे सखोल वर्णन करावे लागते . त्याच मालमत्तेच्या इतर इन्शुरन्स पॉलिसी , त्यांची अंदाजित रक्कम या गोष्टीही नोंदवाव्या लागतात . हे सर्व नुकसान झाल्याच्या १५ दिवसांत करावे लागते .

No comments:

Post a Comment