वित्तीय बाजार अर्थात ' फायनान्शियल मार्केट ' मध्ये उपलब्ध असलेली विविध प्रकारची गुंतवणूक साधने ( ' फायनान्शियल प्रॉडक्ट्स '),
प्रसारमाध्यमांतून त्यांच्या प्रचाराचा सतत होत असलेला भडिमार पाहून
सामान्य गुंतवणूकदार गोंधळून जातो. अशा परिस्थितीत आपल्या आर्थिक स्थितीचा , गुंतवणुकीतील जोखमी आणि मिळू शकणारे उत्पन्न यांचा विचार करून आपल्यासाठी कोणते ' फायनान्शियल प्रॉडक्ट ' योग्य ठरेल हे निश्चित करणे आवश्यक असते.
ईटी ब्युरो
वित्तीय गुंतवणूकसाधनांच्या बाजारपेठेत एक पारंपरिक युक्तिवाद केला जातो , तो म्हणजे कोणत्याही ' फायनान्शियल प्रॉडक्ट ' ची खरेदी करण्यापूर्वी त्या ' प्रॉडक्ट ' सोबत देण्यात आलेली माहिती गुंतवणूकदाराने काळजीपूर्वक वाचावी आणि त्याबाबतच्या अभ्यासानंतर अचूक व सावध असा निर्णय घ्यावा. यात गुंतवणूकसाधन विक्रीस काढणाऱ्यावर ( ' प्रोड्युसर ') नियामक संस्थेने अर्थात ' रेग्युलेटर ' ने निर्धारित केल्याप्रमाणे सर्व संबंधित माहिती अचूक स्वरूपात जाहीर करण्याची जबाबदारी पडते. यामधील पेच असा आहे की ' रेग्युलेटर्स ' आणि ' प्रोड्युसर्स ' अशी अपेक्षा बाळगतात की गुंतवणूकदार ( ' इन्व्हेस्टर ') हा ' डिस्क्लोज ' करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करून त्याला योग्य असेल त्या ' फायनान्शियल प्रॉडक्ट ' ची निवड करील. पण असे होईलच असे नाही. त्यामागे पुढील तीन मुख्य कारणे असतात.
असा भूलभुलैय्या
पहिले कारण , ' प्रोड्युसर्स ' आपली अनेक , खूप ' प्रॉडक्ट्स ' बाजारात आणतात. त्यामध्ये थोडाथोडा फरक करून त्यांना आकर्षक नावे देतात. मात्र , नियामक संस्थेने जारी केलेल्या प्रकटीकरण नियमांचे ( ' डिस्क्लोजर रूल्स ') पालन करतात. अनेक ' प्रॉडक्ट्स ' पाहून गुंतवणूकदार गोंधळून जातो. दुसरे कारण , अशा गुंतवणूकसाधनांचे वितरक ( ' डिस्ट्रिब्युटर्स ') आणि सल्लागार ( ' अॅडव्हायजर्स ') हे ' कमिशन ' मिळविण्यासाठी ' प्रॉडक्ट्स ' ची विक्री करीत असतात. त्यामुळे ते जोरदार प्रचार करून अधिकाधिक ' कमिशन ' कमावण्यासाठी आक्रमक विक्री करतात. हे करण्यामध्ये गुंतवणूकदारांना अपुरी , काहीवेळा चुकीची वा दिशाभूल करणारीही माहिती दिली जाऊन ' बनविण्या ' चे , म्हणजेच ' मिस्सेलिंग ' चे प्रकार घडतात. तिसरे मुख्य कारण आहे , म्युच्युअल फंड व अन्य ' प्रोड्युसर्स ' नी प्रकट केलेली माहिती अर्थात ' डिस्क्लोजर्स ' ही खूपच तांत्रिक स्वरूपाची ( ' टेक्निकल ') आणि गुंतागुंतीची असते. ती वाचून सर्व गुंतवणूकदारांना समजेलच असे नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराला योग्य निर्णय घेणे अवघड जाते.
' प्रॉडक्ट्स ' ची ' सूटेबिलिटी '
पण , आता ' फायनान्शियल मार्केट्स ' हळूहळू आपले लक्ष ' फायनान्शियल प्रॉडक्ट्स ' च्या योग्यतेवर ( ' सूटेबिलिटी ') केंद्रित करू लागले आहेत , जेणेकरून गुंतवणूकदारांना ' अॅडव्हायजर्स ' व ' डिस्ट्रिब्युटर्स ' त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीअनुसार योग्य ठरेल असे गुंतवणूकसाधन निवडण्यासाठी मदत करू शकतील. याचा अर्थ , योग्य ' इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट ' ची निवड गुंतवणूकदाराच्या गरजा समजून घेऊन ' अॅडव्हायजर ' करतो. अनेकजणांना असे वाटते की गुंतवणूकदारांकडून आर्थिक आकडेवारी (फायनान्शियल डेटा) गोळा करणे आणि जोखीमविषयक पार्श्वभूमीबाबत प्रश्नावली ( ' रिस्क प्रोफायलिंग क्वेश्चनायर ') तयार करून त्यांची उत्तरे मिळविणे यातून हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो. पण याही पुढे जाऊन गुंतवणूकदार संरक्षणासाठी नवनवे मार्ग शोधले जाणे आवश्यक आहे.
उदाहरण म्हणून आपण एका सेवानिवृत्त गुंतवणूकदाराचे प्रकरण घेऊ या. पहिला प्रश्न आहे तो त्याच्या गरजांचा किंवा त्याच्या गुंतवणुकीतून त्याला काय अपेक्षित आहे याचा. या सेवानिवृत्ताला नियमित उत्पन्न अपेक्षित आहे , ज्यातून वाढत्या महागाईत त्याचा निभाव लागू शकेल आणि त्याचे भांडवल (गुंतविलेली रक्कम) न घटता सुरक्षित राहू शकेल. दुसरा प्रश्न आहे तो हा की , गुंतवणूकदार ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किती प्रमाणात आपल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. म्हणजेच विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्याच्या गुंतवणुकीची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याच्याजवळ अन्य काही पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत ( ' बफर ' किंवा ' अल्टरनेटिव्ह सोर्सेस ') आहेत किंवा नाही. तिसरा प्रश्न आहे , सदर गुंतवणूकदाराची आपल्या गुंतवणुकीच्या कामगिरीअनुसार गरज असेल तेव्हा गुंतवणुकीत फेरबदल करण्याची कितपत मानसिक तयारी आहे. चौथा प्रश्न आहे , गुंतवणुकीवर अपेक्षेप्रमाणे उत्पन्न ( ' रिटर्न ') मिळाले नाही तर किती प्रमाणात नुकसान सोसण्याची त्याची तयारी आहे जेणेकरून अशा परिस्थितीत त्याला फारसा त्रास होणार नाही. उदाहरणार्थ , मुद्दलाच्या सुरक्षिततेचे उद्दिष्ट (ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेफ्टी ऑफ प्रिन्सिपल) साध्य करण्यासाठी बँकेतील ठेव किंवा एखाद्या सरकारी बचत योजनेतील गुंतवणूक उपयुक्त ठरेल आणि तीतून नियमित उत्पन्नही मिळेल , पण वाढत्या महागाईपासून संरक्षण देण्यासाठी असे उत्पन्न पुरेसे असणार नाही. अशा परिस्थितीत पर्यायी उत्पन्नाची तरतूद असावी लागते. ' सूटेबिलिटी ' च्या या चौकटीत ' अॅडव्हायजर ' त्याला अन्य गुंतवणूक पर्यायही सुचवू शकला पाहिजे.

No comments:
Post a Comment