आयआरडीए ' इन्शुरन्सबाबतच्या निकषांमध्ये बदल केले असून, याची अमलबजावणी लवकरच होणार आहे. त्याचा थोडक्यात आढावा...
ऑक्टोबरपासून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) लोकप्रिय योजना बंद होत आहेत. म्हणजे, ' एलआयसी ' च्या ५० ते ५२ अशा योजनांमध्ये निश्चित परतावा किंवा निष्ठा लाभ किंवा दोन्हीही फायदे समाविष्ट आहेत; तसेच आयुष्यभर ५.५ टक्के दराने करमुक्त नियमित परतावा देण्याची हमी आणि त्याचबरोबर इन्शुरन्स संरक्षणदेखील आयुष्यभरासाठी देण्याची ग्वाही एलआयसी देते आहे. परंतु, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (आयआरडीए) नव्या निकषांनुसार बहुतांश योजनांमध्ये बदल केले जाणार आहेत किंवा बऱ्याचशा योजना बंद केल्या जाणार आहेत. या सर्वांचा परिणाम इन्शुरन्स प्रीमिअम, जोखीम संरक्षण, निश्चित परतावा, निष्ठा लाभ, बोनस, सेवा कर आदींपैकी एका किंवा त्याहून जास्त घटकांवर परिणाम झाल्यास गुंतवणुकीचे आणि त्यावरील परताव्याचे गणित कोलमडू शकते.
' एलआयसी ' ने उपलब्ध करून दिलेल्या ' जीवन अक्षय ' या योजनेअंतर्गत किमान १२ टक्के (द.सा.द.शे) व्याजदराने तहहयात व्याज देण्याची हमी देण्यात आली होती. मात्री, ही योजना बंद झाली.
l ' एलआयसी ' च्या ' जीवन श्री ' योजनेत ७५ रुपये प्रति हजारी, प्रतिवर्षी निश्चित परतावा स्वरूपात, त्याबरोबरच निष्ठा लाभ घोषित करण्यात आला होता. ही योजनादेखील २००१ मध्ये बंद करण्यात आली.
वरील उदाहणांदाखल दिलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याची वैशिष्ट्ये आजमितीस ' एलआयसी ' च्या अन्य योजनांमध्ये समाविष्ट नाहीत. एलआयसी वगळता अन्य इन्शुरन्स कंपन्यांमध्ये त्याची उपलब्धता नाही. थोडासा सखोल विचार केल्यास लक्षात येईल, की सध्याच्या बदलत्या व्याजदरांच्या काळात तहहयात किमान १२ टक्के (द.सा.द.शे) परतावा देण्याची हमी घेणारे आयुर्विमा महामंडळ हे एकमेव उदाहरण आहे. या सर्व आणि याव्यतिरिक्त बहुतांश योजनांमध्ये आजमितीस एलआयसी कोणत्याही प्रकारचा कर, जसा सर्व्हिस टॅक्स आदी ग्राहकाला आकारत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इन्शुनरन्स हप्ता तुलनेने कमी किंमतीत मिळतो व पर्यायाने योजनेचा परतावादेखील स्वाभाविकच जास्त मिळतो.
सर्व्हिस टॅक्स लागू होणार
' आयआरडीए ' च्या परिपत्रकानुसार १ ऑक्टोबरपासून ' एलआयसी ' च्या सर्व योजनांसाठीच्या गुंतवणुकीत इन्शुरन्स हप्त्यावर सर्व्हिस टॅक्स लागू करण्यात येणार असून, त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या ग्राहकाला सहन करावा लागणार आहे.
या सगळ्याची गोळाबेरीज अशी होते, की फायदेशीर गुंतवणूक करायची असल्यास ती १ ऑक्टोबर २०१३ पूर्वी करणे गरजेचे आहे. सूज्ञ गुंतवणूकदार या नात्याने या फायद्यांचा लाभ घेणे हा आपला अधिकार आहे.
for more contact gopal 9820755753

No comments:
Post a Comment