Thursday, 15 August 2013

इन्शुरन्स संरक्षण घ्यायला हवे?

एखादे संकट आपल्यावर किंवा आतेष्टांवर येऊ नये यासाठी बहुधा प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. मात्र, मानवनिर्मित किंवा रौद्ररूप धारण केलेली नैसर्गिक आपत्ती कधीही कल्पना देऊन येत नाही. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या एका विनाशकारी आपत्तीतून हे स्पष्ट झाले. कोणतीही आपत्ती किंवा त्याचे होणारे परिणाम हे टाळता येत नाहीत. मात्र, यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याची तीव्रता पुरेसा इन्शुरन्स उतरवून कमी करता येऊ शकते. इन्शुरन्स एजंट किंवा बँकेच्या विक्रीच्या जाळ्यात न आडकल्यास खिशाला चाट बसण्याची शक्यता कमी असते. एखाद्या पेचातून वाचण्यासाठी विशिष्ट इन्शुरन्स कव्हर उपयोगाचे ठरू शकते. कोणती पाच इन्शुरन्स कव्हर उपयुक्त ठरतील त्याविषयी पाहू.

प्रीती कुलकर्णी, ईटी ब्यूरो

एखादे संकट आपल्यावर किंवा आतेष्टांवर येऊ नये यासाठी बहुधा प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. मात्र, मानवनिर्मित किंवा रौद्ररूप धारण केलेली नैसर्गिक आपत्ती कधीही कल्पना देऊन येत नाही. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या एका विनाशकारी आपत्तीतून हे स्पष्ट झाले. कोणतीही आपत्ती किंवा त्याचे होणारे परिणाम हे टाळता येत नाहीत. मात्र, यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याची तीव्रता पुरेसा इन्शुरन्स उतरवून कमी करता येऊ शकते. इन्शुरन्स एजंट किंवा बँकेच्या विक्रीच्या जाळ्यात न आडकल्यास खिशाला चाट बसण्याची शक्यता कमी असते. एखाद्या पेचातून वाचण्यासाठी विशिष्ट इन्शुरन्स कव्हर उपयोगाचे ठरू शकते. कोणती पाच इन्शुरन्स कव्हर उपयुक्त ठरतील त्याविषयी पाहू.

टर्म इन्शुरन्स

फायनान्शिअल प्लॅनिंगसाठी एखाद्या ' फायनान्शिअल प्लॅनर ' कडे गेल्यावर मुदतबंद विमा योजना ( ' टर्म इन्शुरन्स ') खरेदी करा, अशी सूचना करण्यात येऊ शकते. ' एंडाउमेन्ट प्लॅन ' आणि ' युनिट लिंक्ड प्लॅन ( ' युलिप ') या प्रकारातील इन्शुरन्स प्लॅनमध्ये विशिष्ट रक्कम जमा होते. मात्र, ' टर्म इन्शुरन्स ' मध्ये कोणतेही भांडवल जमा होत नाही. इन्शुरन्स कव्हर घेण्याचा सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर या पॉलिसीचा लाभ मिळतो. संबंधित इन्शुरन्स पॉलिसीच्या नामनिर्देशित व्यक्तीला अर्थात ' नॉमिनी ' ला विशिष्ट रक्कम दिली जाते. या इन्शुरन्समुळे आर्थिक सुरक्षा आणि मनाला शांती मिळते. अशा प्रकारच्या इन्शुरन्सचा प्रीमिअमही कमी असतो. पंचवीस वर्षाच्या आणि धूम्रपान करीत नसलेल्या व्यक्तीस सहा हजार रुपयांत वार्षिक एक कोटीचे इन्शुरन्स कव्हर मिळू शकते. टर्म पॉलिसीची विक्री ही ' ऑनलाइन ' देखील होते आणि या मार्गाने ती खरेदी केल्यास स्वस्तात मिळते. ' नोकरीच्या काळात अनेक लोक मोठी देणी ( ' लायबिलिटीज ') उभ्या करतात. गहाणवट अर्थात ' मॉर्ट्गेज ' स्वरूपातील कर्जे, कार आणि वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड अशा कर्जांचा त्यात समावेश असतो; तसेच याव्यतिरिक्त मुलांसाठीचा खर्च, शिक्षण आणि जीवनशैलीशी ( ' लाइफस्टाइल ') निगडित खर्चही असतो. कमवत्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत या गोष्टी खऱ्या अर्थाने ' लायबिलिटी ' ठरू शकतात. त्यामुळे इन्शुरन्स कव्हर अशा वेळी उपयुक्त ठरते, ' असे ' कोटक लाइफ ' च्या सुनिल शर्मा यांनी सांगितले. शिल्लक राहिलेली कर्जाची रक्कम आणि पुढील पाच वर्षांतील अपेक्षित उत्पन्न हे लक्षात घेऊन त्यांच्या समान लाइफ इन्शुरन्स कव्हर घेणे अपेक्षित आहे.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स

अशाप्रकारच्या इन्शुरन्सचे कव्हर हे फक्त अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यास मिळते. मात्र, अॅक्सिडेंटमुळे अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई संबंधित व्यक्तीला मिळते. ' अॅक्सिडेंट आणि अपंगत्वासाठी इन्शुरन्स कव्हर घेणे हे इन्शुरन्स क्षेत्रात अधोरेखित न होणारे प्रॉडक्ट आहे, ' असे मीडिया डॉट कॉम या हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील सल्लागार संस्थेच्या पर्सनल लाइन्स आणि ई-बिझनेसचे प्रमुख महावीर चोप्रा यांनी सांगितले. ' अपघात किंवा अपंगत्व येण्याची जोखीम खूप मोठी आहे. अपघातामुळे काही दिवस कामापासून दूर राहावे लागू शकते आणि त्यामुळे उत्पन्न गमविण्याची वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत डिसेबिलिटी कव्हर हे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा अधिक उपयोगी पडते, ' असे चोप्रा यांनी स्पष्ट केले. अशी पॉलिसी घेताना मृत्यू, कायमचे अपंगत्व, तात्पुरते अपंगत्व आणि कायमचे अशंतः अपंगत्व या गोष्टींसाठी कव्हर घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हेल्थ कव्हर

' आरोग्य खर्चात वाढ होत असल्याने प्रत्येकाने इन्शुरन्स पॉलिसी काढणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने ' इंडेम्निटी ' वर आधारित कव्हर आहे का नाही हे पाहावे, ' असे मॅक्स बुपा कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी नीरज बासूर यांनी सांगितले. तरुण वयातच इन्शुरन्स काढणे हे योग्य असते. वय वाढल्यावर इन्शुरन्स काढल्यास प्रीमियमही वाढतो. कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या ' कव्हर ' वर अवलंबून राहू नये. नोकरी सोडल्यास, असे ' कव्हर ' बंद होते आणि जोखीम वाढते. फिक्सड बेनिफिट प्लॅनचा समावेश करून कव्हर वाढविता येऊ शकतो. क्लेम आल्यास निर्धारित रक्कम मिळते. ' कामावर जाण्यास अडथळा आल्यास अशा प्रकारच्या वैशिष्ट्यामुळे मदत होते. इन्शुरन्सधारकास ही रक्कम मिळत असल्याने हॉस्पिटलचा खर्च सोडून अन्य खर्च भागविता येण्यासाठी ही रक्कम वापरता येऊ शकते, ' असे बासूर यांनी सांगितले.

' क्रिटिकल इलनेस '

हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेताना ' क्रिटिकल इलनेस कव्हर ' हवे आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, असे कव्हर घ्यावे.

' हेल्थ कव्हर ' मध्ये हॉस्पिटलचा खर्च आणि अन्य संबंधित खर्चाला कव्हर मिळते. कॅन्सर आणि मल्टिपल स्केलोरोसिससारख्या प्राणघातक आजारांवर दीर्घकालीन उपचाराची गरज असते. अशासाठी होणारा खर्च हा ' क्रिटिकल इलनेस कव्हर ' मुळे कव्हर होतो. बहुतेक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनवर कमाल दहा लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते. ' क्रिटिकल इलनेसचे कव्हर नसल्यास त्या आजारापेक्षा खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत काळजी वाढते. आरोग्य क्षेत्रात झालेल्या नव्या संशोधनांमुळे मनुष्याचे आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते. क्रिटिकल इलनेस प्रकारातील आजारावरील खर्च हा हे एक आव्हानच आहे, ' असे चोप्रा यांनी सांगितले. ' कॅन्सरसारखा आजारावर उपचार केल्यानंतर एखादी व्यक्ती कामावर रूजू होण्यास असमर्थ ठरल्यास क्रिटिकल इलनेस कव्हर उपयुक्त ठरू शकते, ' असे चोप्रा यांनी नमूद केले. टर्म इन्शवुन्सबरोबर क्रिटिकल इलनेस राइडर घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

' होम इन्शुरन्स '

होम लोन घेणारे बहुतेक कर्जदारांना होम लोन इन्शुरन्सची कल्पना असते. मात्र, होम इन्शुरन्स हा वेगळा असतो. कर्जफेडीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ' होम लोन इन्शुरन्स ' मुळे कर्जाचे दायित्व हे अशा इन्शुरन्समधून पूर्ण होते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याच्या खर्चापासून होम इन्शुरन्स उपयोगी पडतो. ' उत्तराखंडात पूरामुळे घरांबरोबर मालमत्तेचे नुकसान झाले. काही लोकांमध्ये पुन्हा स्वतः घर बांधण्याची क्षमता आहे. होम इन्शुरन्समुळे लोकांना आर्थिक संरक्षण मिळू शकते, '

No comments:

Post a Comment