Tuesday, 31 July 2012

लाइफ इन्शुरन्समधून संपत्तीनिर्मिती

 बचत वा गुंतवणुकीचे रक्षण : लाइफ इन्शुरन्स योजना बचतीसाठीच्या उत्पादनांत मृत्यू, गंभीर आजार वा अपघात यापासून संरक्षण देतात.

जसे की, जेव्हा एखादी व्यक्ती १ लाख रुपयांच्या विमा रकमेचा सेव्हिंग प्लॅन (एंडोमेंट प्लॅन म्हणू) घेते आणि किमान २० वर्षाच्या कालावधीच्या योजनेतील ५ हजार रु. इतका पहिला वाषिर्क हप्ता भरते तेव्हा संबंधित विमा कंपनी योजनेच्या कालावधीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १ लाख रु. देण्याचे आश्वासन देते. यामुळे त्या व्यक्तीला मृत्यूमुळे कुटुंबासाठी बचत करणे शक्य झाले नाही तरी या योजनेमुळे त्याला अपेक्षित असलेली संपत्तीनिमिर्ती होऊ शकते. त्यामुळे लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या बचत योजनेत आपल्याला अपेक्षित बचतीचा समावेश असतो.

हीच गोष्ट घटते लाइफ इन्शुरन्स कव्हर घेऊनही साध्य करता येईल. गुंतवणूकदाराला लाइफ इन्शुरन्सखेरीज कोणताही पर्याय निवडता येईल. अशा वेळी, घटते लाइफ इन्शुरन्स कव्हरलबिक योजनाधारकाने केलेली बचत योजनेच्या काळात त्याचा मृत्यू झाल्यास योजनेच्या वारसाला दिली जाते. यामध्ये एंडोमेंट योजनेप्रमाणेच परिणाम दिसतो.

* नियमित बचत : लाइफ इन्शुरन्स योजनेचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरायला हवेत. लाइफ इन्शुरन्स योजनेमार्फत संपत्तीनिर्मिती करायची असे एकदा ठरले की, त्याचे हप्ते नियमित भरायला हवे जेणे करून इच्छित संपत्तीनिर्मिती होईल.

* आणीबाणीच्या निधीची उपलब्धता : संपत्तीनिर्मिती वर्गातील बहुतांश लाइफ इन्शुरन्स योजना योजनाकर्ज देतात किंवा सुरुवातीच्या वर्षांनंतर पैसे काढून घेण्याची परवानगी देतात. किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते आणि ते घेण्याची प्रक्रियाही सोपी असते. यामुळे आणीबाणीच्या काळात आवश्यक असलेला निधी जमवण्यासाठी मदत होते.

* संपत्तीचे रक्षण : लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग करारात टर्म, क्रिटिकल इलनेस बेनिफिट, अॅक्सिडंट बेनिफिट असे रायडर मिळतात. त्यातून मूळ योजनेपेक्षा अधिक संरक्षण दिले जाते. दुर्दैवी घटना घडल्यास, रायडरसाठी दिलेल्या रकमेमुळे मूळ योजनेतील संपत्ती सुरक्षित राहते आणि संपत्तीनिमिर्तीची प्रक्रिया तशीच पुढे सुरू राहते.

विमा कंपन्या पुढील प्रकारच्या संपत्तीनिर्मिती योजना देऊ करतात :

* नफ्यासहित पारंपरिक योजना : या योजनांमध्ये योजनाधारकांना पारंपरिक योजनांतून नफा कमावता येतो. योजनेत विशिष्ट सम अॅश्युअर्ड असते आणि त्यासोबत बोनसही मिळतात. या योजनेत मुदतपूतीर्च्या वा मृत्यूच्या वेळी टर्मिनल बोनस देण्याची तरतूद असते. मृत्यू वा मुदतपूर्ती यापैकी जे आधी असेल तेव्हा सम अॅश्युअर्ड आणि बोनस यामुळे मोठी रक्कम मिळत असल्याने बचत सुरक्षित राहू शकते. बचतीला आणखी संरक्षण मिळण्यासाठी या योजनेमध्ये रायडर समाविष्ट करता येतात.

* युनिट-लिंक्ड योजना : या योजनेच्या नावाप्रमाणे, या योजना एक वा अधिक युनिट-लिंक्ड फंडात गुंतवणूक करून बचत वाढवण्यात मदत करतात. योजनाधारकांना बचतीसहित आपल्या आवडीप्रमाणे कव्हर निवडता येते. योजनेच्या काळात योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास योजनेचा निधी आणि कव्हरची रक्कम योजनेतील वारसाला दिली जाते. योजनाधारकांना मृत्यू, क्रिटिकल इलनेस वा अपघात यासाठी कव्हर निवडता येते. योजनाधारकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या योजना जास्तीत जास्त वा कमीत कमी प्रमाणात इक्विटीत गुंतवणूक करण्याची सोय देतात.

* संरक्षण योजना : या योजना निश्चित वा घटते कव्हर देऊन निव्वळ संरक्षण देतात. विम्याव्यतिरिक्त अन्य पर्यायांत गुंतवणूक करायचे ठरवल्यास गुंतवणूकदार त्या गुंतवणुकीला संरक्षण कवच देण्यासाठी या योजना निवडतात. या योजनांचा सगळ्यात उत्तम भाग म्हणजे, बचतीला सुरुवात करण्यापूर्वीच संपत्तीनिर्मितीची सुरुवात या योजनेमुळे होऊ शकते.

जसे की, अपत्य असलेल्या आणि त्याच्यासाठी भविष्यात मोठ्या योजना आखलेल्या एका व्यक्तीला एक आथिर्क सल्लागार भेटतो. या उदाहरणासाठी समजू की, त्या व्यक्तीच्या योजनेनुसार, त्याला अपत्यासाठी अशी बचत करायची आहे जी नंतर २० लाख रु. होईल. त्याने अलिकडेच कर्ज काढून घर घेतले आहे. त्याचे विनियोग करण्यासारखे उत्पन्न फार नाही आणि त्याला तातडीने बचतीला सुरुवात करणे शक्य नाही. पण त्याला आपल्या अपत्याला चांगले भविष्य द्यायचे आहे. त्यासाठी त्याला शक्य तितक्या लवकर बचतीला सुरुवात करायची आहे. सर्वसामान्य आथिर्क सल्लागाराला यामध्ये व्यवसायाची संधी दिसणार नाही. त्या व्यक्तीला जेव्हा विमा परवडणार असेल तेव्हा भेटण्याचे सांगून तो तिथून निघून जाईल. पण प्रोफेशनल सल्लागार ही व्यक्ती कशा प्रकारे जोखीम घेऊ शकते ते पाहील आणि त्याला टर्म प्लॅन घेण्याचे सुचवेल. यामुळे त्या व्यक्तीच्या कर्जाच्या जबाबदारीला संरक्षण मिळेल आणि त्याचे २० लाख रु.चे स्वप्नही सुरक्षित राहील. तो जोखीम आणि त्या जोखमीला संरक्षण देण्याची शक्यता समजावून सांगेल आणि टर्म विमा घेण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता तयार करेल. योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास आणि त्याने पुरेशा रकमेला विमा कवच दिले असेल तर टर्म इन्शुरन्स त्याचे कर्ज परत करेल (त्याच्या घराचे रक्षण करेल) आणि त्याचे स्वप्नही सुरक्षित ठेवेल (मुलासाठी २० लाख रु. जमा करण्याचे). बचतीला सुरुवात होण्यापूवीर्च हे कवच सुरू होते. योजनाधारक प्रत्यक्ष बचतीला सुरुवात करतो आणि पुरेसा निधी जमा होतो तेव्हा जास्तीचे विमा कवच न घेण्याबाबत तो निर्णय घेऊ शकतो.





Zindagi Ke Saath Bhi Zindagi Ke Bad BhiGOPAL GADGIL LIC AGENT 9820755753

No comments:

Post a Comment