Monday, 30 July 2012

आपण समजा उद्या नसलो तर ? येणाऱ्या वादळी दिवसांची तयारी आत्ताच कराया अतिशय महत्वाचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असायला हवा य

आपण समजा उद्या नसलो तर ? येणाऱ्या वादळी दिवसांची  तयारी आत्ताच करा
या अतिशय महत्वाचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असायला हवा यात वाद नाही.  थोडक्यात आपल्या संपत्तीचे योग्य प्लान्निंग करायला हवे आणि या गोष्टी रामभरोसे सोडून द्यायला नको असा मतितार्थ आहे. आपापल्या संपत्ती चे नियोजन सल्लागार  , गुंतवणूक सल्लागार यांना भेटला  तरी हा सल्ला मिळू शकेल....
 १) आपापली बँक खाती, गुंतवणूक, demat ,FDs , लोकर , PF , Pension   इत्यादी वरील nomonations चेक  करा. आपल्या पत्नीचे/पतीचे नाव घालायला विसरू नका
 २) कागदावरती सर्व passwords लिहून ठेवा. (हे मला मान्य नाही. या करता एक वेगळी website आहे
 password saver websites वापरायला पाहिजेत कि ज्यायोगे कागद हरवण्याचा/चोरीला जाण्याचा  धोका राहणार नाही.
3) प्रत्येक वर्षी बरेच लोक कर वाचवण्यासाठी आणि इतर उद्देशांसाठी गुंतवणूक करतात. त्यासाठी दरवर्षी MS Excel मध्ये (कमीतकमी) आपला portfolio update ठेवा.   त्याची कागदी प्रत काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा
4) प्रत्येकाने आपले मृत्युपत्र तयार केले पाहिजे. त्याने तुमचे आयुष्य सुखकर होईल. त्याने नंतरचा खूप त्रास वाचेल. (उदा; Indenmity  Bonds , त्याचे notarisation , Surety , NOC इ.   )
5) जेव्हा आपण एखादे कर्ज घेता (घरासाठी, कार साठी वगैरे) तेव्हा भविष्यातील आडी अडचणींचाही  विचार करा. निधन झाले, नोकरी गेली , विमा मिळाला नाही तर काय, या योगे तुमच्या नंतर जे जिवंत राहणार आहेत त्यांचे आयुष्य कमी कष्टदायक होईल हा विचार आत्ताच करा.
पुढे काय वाढून ठेवले आहे ते कुणालाच माहित नाही पण त्या वादळी दिवसांची तयारी आत्ताच करून ठेवा.

No comments:

Post a Comment