Tuesday, 31 July 2012

275 per day

SAMPOORN JEEAN + SARAL SHAKTI+ SURAKSHA KAVACH






AVAIL ANY OF THE SERVICES IN “FREE”.

DEAR SIR / MADAM ,


Do you have any problem in your existing LIC policy?

Do you need any services for your existing LIC policy?

Are you not getting proper services from your agent?

Are you not satisfied with the services of your agent?


HERE IS THE “FREE” SOLUTION FOR YOUR PROBLEM.

SOLVE YOUR PROBLEM & AVAIL ANY OF THE SERVICES IN “FREE”.


We provide you following “FREE” services for your existing LIC policy.


CASH FLOW CHART.

PREMIUM CALANDER.

BONUS STATUS.

PREMIUM REMINDER IN FUTURE.

CHANGE OF ADDRESS.

CHANGE OF NOMINATION.

FRESH NOMINATION.

ASSIGNMENT OF POLICY.

REASSIGNMENT OF LIC POLICY.

LOAN QUOTATION.

SURRENDER QUOTATION.

SETTLEMENT OF OUTSTANDING DEATH CLAIM. (IF ANY)

SETTLEMENT OF OUSTANDING MATURITY CLAIM. (IF ANY)

SETTLEMANT OF MONEY BACK AMOUNT DUE. (IF ANY)

DUPLICATE LIC POLICY, IF ORIGINAL IS LOST.

REDUCTION IN SUM ASSURED.

ADVANCE PREMIUM PAYMENT.

AVAIL DOUBLE ACCIDENT BENEFIT.

CONVERSION

RETIREMENT

Don’t make the same mistake which many unhappy retired people did by depending on their children after retirement.Invest in your selfrespect with LIC pension plans for a happy retired life. Call 9820755753

लाइफ इन्शुरन्समधून संपत्तीनिर्मिती

 बचत वा गुंतवणुकीचे रक्षण : लाइफ इन्शुरन्स योजना बचतीसाठीच्या उत्पादनांत मृत्यू, गंभीर आजार वा अपघात यापासून संरक्षण देतात.

जसे की, जेव्हा एखादी व्यक्ती १ लाख रुपयांच्या विमा रकमेचा सेव्हिंग प्लॅन (एंडोमेंट प्लॅन म्हणू) घेते आणि किमान २० वर्षाच्या कालावधीच्या योजनेतील ५ हजार रु. इतका पहिला वाषिर्क हप्ता भरते तेव्हा संबंधित विमा कंपनी योजनेच्या कालावधीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १ लाख रु. देण्याचे आश्वासन देते. यामुळे त्या व्यक्तीला मृत्यूमुळे कुटुंबासाठी बचत करणे शक्य झाले नाही तरी या योजनेमुळे त्याला अपेक्षित असलेली संपत्तीनिमिर्ती होऊ शकते. त्यामुळे लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या बचत योजनेत आपल्याला अपेक्षित बचतीचा समावेश असतो.

हीच गोष्ट घटते लाइफ इन्शुरन्स कव्हर घेऊनही साध्य करता येईल. गुंतवणूकदाराला लाइफ इन्शुरन्सखेरीज कोणताही पर्याय निवडता येईल. अशा वेळी, घटते लाइफ इन्शुरन्स कव्हरलबिक योजनाधारकाने केलेली बचत योजनेच्या काळात त्याचा मृत्यू झाल्यास योजनेच्या वारसाला दिली जाते. यामध्ये एंडोमेंट योजनेप्रमाणेच परिणाम दिसतो.

* नियमित बचत : लाइफ इन्शुरन्स योजनेचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरायला हवेत. लाइफ इन्शुरन्स योजनेमार्फत संपत्तीनिर्मिती करायची असे एकदा ठरले की, त्याचे हप्ते नियमित भरायला हवे जेणे करून इच्छित संपत्तीनिर्मिती होईल.

* आणीबाणीच्या निधीची उपलब्धता : संपत्तीनिर्मिती वर्गातील बहुतांश लाइफ इन्शुरन्स योजना योजनाकर्ज देतात किंवा सुरुवातीच्या वर्षांनंतर पैसे काढून घेण्याची परवानगी देतात. किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते आणि ते घेण्याची प्रक्रियाही सोपी असते. यामुळे आणीबाणीच्या काळात आवश्यक असलेला निधी जमवण्यासाठी मदत होते.

* संपत्तीचे रक्षण : लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग करारात टर्म, क्रिटिकल इलनेस बेनिफिट, अॅक्सिडंट बेनिफिट असे रायडर मिळतात. त्यातून मूळ योजनेपेक्षा अधिक संरक्षण दिले जाते. दुर्दैवी घटना घडल्यास, रायडरसाठी दिलेल्या रकमेमुळे मूळ योजनेतील संपत्ती सुरक्षित राहते आणि संपत्तीनिमिर्तीची प्रक्रिया तशीच पुढे सुरू राहते.

विमा कंपन्या पुढील प्रकारच्या संपत्तीनिर्मिती योजना देऊ करतात :

* नफ्यासहित पारंपरिक योजना : या योजनांमध्ये योजनाधारकांना पारंपरिक योजनांतून नफा कमावता येतो. योजनेत विशिष्ट सम अॅश्युअर्ड असते आणि त्यासोबत बोनसही मिळतात. या योजनेत मुदतपूतीर्च्या वा मृत्यूच्या वेळी टर्मिनल बोनस देण्याची तरतूद असते. मृत्यू वा मुदतपूर्ती यापैकी जे आधी असेल तेव्हा सम अॅश्युअर्ड आणि बोनस यामुळे मोठी रक्कम मिळत असल्याने बचत सुरक्षित राहू शकते. बचतीला आणखी संरक्षण मिळण्यासाठी या योजनेमध्ये रायडर समाविष्ट करता येतात.

* युनिट-लिंक्ड योजना : या योजनेच्या नावाप्रमाणे, या योजना एक वा अधिक युनिट-लिंक्ड फंडात गुंतवणूक करून बचत वाढवण्यात मदत करतात. योजनाधारकांना बचतीसहित आपल्या आवडीप्रमाणे कव्हर निवडता येते. योजनेच्या काळात योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास योजनेचा निधी आणि कव्हरची रक्कम योजनेतील वारसाला दिली जाते. योजनाधारकांना मृत्यू, क्रिटिकल इलनेस वा अपघात यासाठी कव्हर निवडता येते. योजनाधारकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या योजना जास्तीत जास्त वा कमीत कमी प्रमाणात इक्विटीत गुंतवणूक करण्याची सोय देतात.

* संरक्षण योजना : या योजना निश्चित वा घटते कव्हर देऊन निव्वळ संरक्षण देतात. विम्याव्यतिरिक्त अन्य पर्यायांत गुंतवणूक करायचे ठरवल्यास गुंतवणूकदार त्या गुंतवणुकीला संरक्षण कवच देण्यासाठी या योजना निवडतात. या योजनांचा सगळ्यात उत्तम भाग म्हणजे, बचतीला सुरुवात करण्यापूर्वीच संपत्तीनिर्मितीची सुरुवात या योजनेमुळे होऊ शकते.

जसे की, अपत्य असलेल्या आणि त्याच्यासाठी भविष्यात मोठ्या योजना आखलेल्या एका व्यक्तीला एक आथिर्क सल्लागार भेटतो. या उदाहरणासाठी समजू की, त्या व्यक्तीच्या योजनेनुसार, त्याला अपत्यासाठी अशी बचत करायची आहे जी नंतर २० लाख रु. होईल. त्याने अलिकडेच कर्ज काढून घर घेतले आहे. त्याचे विनियोग करण्यासारखे उत्पन्न फार नाही आणि त्याला तातडीने बचतीला सुरुवात करणे शक्य नाही. पण त्याला आपल्या अपत्याला चांगले भविष्य द्यायचे आहे. त्यासाठी त्याला शक्य तितक्या लवकर बचतीला सुरुवात करायची आहे. सर्वसामान्य आथिर्क सल्लागाराला यामध्ये व्यवसायाची संधी दिसणार नाही. त्या व्यक्तीला जेव्हा विमा परवडणार असेल तेव्हा भेटण्याचे सांगून तो तिथून निघून जाईल. पण प्रोफेशनल सल्लागार ही व्यक्ती कशा प्रकारे जोखीम घेऊ शकते ते पाहील आणि त्याला टर्म प्लॅन घेण्याचे सुचवेल. यामुळे त्या व्यक्तीच्या कर्जाच्या जबाबदारीला संरक्षण मिळेल आणि त्याचे २० लाख रु.चे स्वप्नही सुरक्षित राहील. तो जोखीम आणि त्या जोखमीला संरक्षण देण्याची शक्यता समजावून सांगेल आणि टर्म विमा घेण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता तयार करेल. योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास आणि त्याने पुरेशा रकमेला विमा कवच दिले असेल तर टर्म इन्शुरन्स त्याचे कर्ज परत करेल (त्याच्या घराचे रक्षण करेल) आणि त्याचे स्वप्नही सुरक्षित ठेवेल (मुलासाठी २० लाख रु. जमा करण्याचे). बचतीला सुरुवात होण्यापूवीर्च हे कवच सुरू होते. योजनाधारक प्रत्यक्ष बचतीला सुरुवात करतो आणि पुरेसा निधी जमा होतो तेव्हा जास्तीचे विमा कवच न घेण्याबाबत तो निर्णय घेऊ शकतो.





Zindagi Ke Saath Bhi Zindagi Ke Bad BhiGOPAL GADGIL LIC AGENT 9820755753

थोर नेत्यांचे थोर विचार

थोर नेत्यांचे थोर विचार.


- सर्वपल्ली राधाकृष्णन*

* जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते
संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. * -
नारायण मूर्ती *
* यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे
मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला,
स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे
म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.* -
 विश्वनाथन आनंद*
* नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे
काही शक्य आहे.** *
- धीरूभाई अंबानी *
* पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत
जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. -
 जे. आर.डी. टाटा *
* फोटोग्राफरच्या एका “क्लिक’मुळे जगणे चिरकाल
होते.** *
- रघू राय *
* चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे
ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.* -
बिल गेट्स *
* मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून
पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण
तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. * -
कल्पना चावला *
* कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. -
बराक ओबामा *
* माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट
पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात
इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. *
- आयझॅक न्यूटन
* मानवाचा दानव होणे ही त्याची हार;
मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा “माणूस’ होणे; हे त्याचे यश आहे.*

LIC PROFILE






Monday, 30 July 2012

bima bemisal


आपण समजा उद्या नसलो तर ? येणाऱ्या वादळी दिवसांची तयारी आत्ताच कराया अतिशय महत्वाचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असायला हवा य

आपण समजा उद्या नसलो तर ? येणाऱ्या वादळी दिवसांची  तयारी आत्ताच करा
या अतिशय महत्वाचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असायला हवा यात वाद नाही.  थोडक्यात आपल्या संपत्तीचे योग्य प्लान्निंग करायला हवे आणि या गोष्टी रामभरोसे सोडून द्यायला नको असा मतितार्थ आहे. आपापल्या संपत्ती चे नियोजन सल्लागार  , गुंतवणूक सल्लागार यांना भेटला  तरी हा सल्ला मिळू शकेल....
 १) आपापली बँक खाती, गुंतवणूक, demat ,FDs , लोकर , PF , Pension   इत्यादी वरील nomonations चेक  करा. आपल्या पत्नीचे/पतीचे नाव घालायला विसरू नका
 २) कागदावरती सर्व passwords लिहून ठेवा. (हे मला मान्य नाही. या करता एक वेगळी website आहे
 password saver websites वापरायला पाहिजेत कि ज्यायोगे कागद हरवण्याचा/चोरीला जाण्याचा  धोका राहणार नाही.
3) प्रत्येक वर्षी बरेच लोक कर वाचवण्यासाठी आणि इतर उद्देशांसाठी गुंतवणूक करतात. त्यासाठी दरवर्षी MS Excel मध्ये (कमीतकमी) आपला portfolio update ठेवा.   त्याची कागदी प्रत काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा
4) प्रत्येकाने आपले मृत्युपत्र तयार केले पाहिजे. त्याने तुमचे आयुष्य सुखकर होईल. त्याने नंतरचा खूप त्रास वाचेल. (उदा; Indenmity  Bonds , त्याचे notarisation , Surety , NOC इ.   )
5) जेव्हा आपण एखादे कर्ज घेता (घरासाठी, कार साठी वगैरे) तेव्हा भविष्यातील आडी अडचणींचाही  विचार करा. निधन झाले, नोकरी गेली , विमा मिळाला नाही तर काय, या योगे तुमच्या नंतर जे जिवंत राहणार आहेत त्यांचे आयुष्य कमी कष्टदायक होईल हा विचार आत्ताच करा.
पुढे काय वाढून ठेवले आहे ते कुणालाच माहित नाही पण त्या वादळी दिवसांची तयारी आत्ताच करून ठेवा.

Aajeevan varsha

RAKSHABANDHAN

गोपा ळ 9820755753

Saturday, 28 July 2012

महागाई आणि विमा कवच

वाढत्या महागाईला तोंड देणे आणि विम्याच्या संरक्षक कवचाचे नियोजन करणे या गोष्टी बहुधा स्वतंत्ररित्या केल्या जातात आणि त्यामुळे दोन्हींचा मेळ साधून संपूर्ण चित्र कसे तयार होईल, याची कल्पना अनेकदा येत नाही. ढोबळ नियमाप्रमाणे वाषिर्क उत्पन्नाच्या सुमारे १२ पट, त्यातून गुंतवणूक मालमत्ता वजा केल्यावर आणि दायित्वाची रक्कम त्यात मिळवल्यावर, इतके जीवन संरक्षण तुम्ही घ्यावे असे असले तरी दुसरे मिश्रणही विचारत घेणे महत्त्वाचे आहे - तुमचे वाढते उत्पन्न आणि भाववाढीची चढती कमान. तुमच्या वाढलेल्या उत्पन्नाचा तुमच्या राहणीमानावर साहजिक परिणाम होईल आणि वाढत्या भाववाढीचा वैयक्तिक वापरासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर अनेक प्रकारे परिणाम होईल.

कुटंुबप्रमुख म्हणून कुटुंबियांची जबाबदारी तुम्ही पूर्ण केली पाहिजे. मात्र, कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास वा त्याला अपंगत्व आल्यास ती व्यक्ती नसतानाही कुटुंबाने जीवनशैली कायम राहील, याची काळजी घेणे गरजेचे असते. म्हणून, फक्त थोड्या वर्षांसाठी टर्म इन्शुरन्स घ्यायचा नसेल तर भाववाढीचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. पैशाचे भविष्यातील मूल्य गणतीत असले पाहिजे व म्हणूनच जीवन विमा गरजांचा नियमित आढावा घेतला पाहिजे. दीर्घ काळासाठी पॉलिसी घेताना - समजा २० किंवा त्याहून जास्त वर्षांसाठी- किंवा होल लाइफ पॉलिसी घेताना पैशाचे भविष्यातील मूल्य विचारात घ्यायला हवे.

भाववाढीचा विचार का महत्त्वाचा?

बहुतेक व्यक्ती विमा योजना खरेदी करतात तेव्हा अनेकदा पैशाचे भविष्यातील मूल्य विचारात घ्यायला विसरतात. प्रमाणित क्रयशक्तीच्या सापेक्ष मोजलेल्या किमतींतील सर्वसाधारण वाढ भाववाढ दाराने निदशिर्त होते. भाववाढीची सर्वांना माहीत असलेली मोजमापे म्हणजे 'सीपीआय', जे ग्राहक किंमती मोजते आणि 'जीडीपी डिफ्लेटर', जे स्थानिक अर्थव्यवस्थेतील भाववाढ मोजते.

आरोग्य आणि शिक्षणाचा खर्चही झपाट्याने वाढला आहे. चलनवाढीचा धोका सर्व वयोगटाच्या लोकांना आसतो, कारण पैशाचे भविष्यातील मूल्य तुमची सध्याची जीवनशैली पेलण्यास कदाचित असमर्थ ठरू शकेल.

पॉलिसीवर भाववाढीतल्या वेळेचा परिणाम

टर्म इन्शुरन्स पॉलिसी साधारणपणे १५,२० वा ३० वषेर् अशा दीर्घ कालावधीसाठी असते. टर्म इन्शुरन्स पॉलिसीसाठी तुम्ही देत असणारा दर व्याख्येनुसार ठराविक असतो जो तुम्ही या कालावधीत देता. त्यामुळे, भाववाढीचा दर सर्वसाधारणपणे वाषिर्क ७-९ टक्के असल्याने रुपयाचे मूल्य दरवषीर् या प्रमाणात घसरते.

याचाच अर्थ असा की रुपयाची क्रयशक्ती कमी झाली आहे आणि पैशाच्या परिमाणात मागील वर्षाएवढाच विमा संरक्षण फायदा त्यातून खरेदी करणे शक्य होत नाही.

लाइफ इन्शुरन्ससाठी दरमहा जो प्रिमियम तुम्ही आज भरता तो रुपयामध्ये तेवढाच राहील पण भाववाढीच्या कारणामुळे आजपासून दहा वर्षांनी तो कमी पैसा असेल. २०११ मध्ये १० लाख रु.मध्ये जे काही खरेदी करता येत होते त्यासाठी - ८ टक्के भाववाढीचा दर पकडल्यास - २०३१ मध्ये सुमारे ४५ लाख रुपये लागतील.

वाढत्या श्रेणीच्या टर्म अॅश्युरन्स पॉलिसी

वाढत्या श्रेणीची टर्म अॅश्युरन्स पॉलिसी तुम्हाला अशी लवचिकता देईल की भाववाढीचा दर प्रतिबिंबित होण्याच्या दृष्टीने तुमची 'विम्याची रक्कम' (तुमचा मृत्यू झाल्यास जे पैसे हातात येतील) दरवषीर् ५-१० टक्क्यांनी वाढेल. अशा रितीने अशी पॉलिसी विमा रक्कम वाढवण्याचा पर्याय देऊन राहणीमानाच्या वाढत्या खर्चाविरुद्ध संरक्षण ('हेजिंग') देईल. त्यातून परवडणाऱ्या खर्चात पुरेसे संरक्षण मिळते. बहुतेक कंपन्या या वाढत्या विमा रकमेबरोबर, किरकोळ अतिरिक्त खर्चात आणि धूम्रपान न करणे वगैरे आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी बक्षीस म्हणून, योग्य ते रायडर पर्यायही देतात. काही पॉलिसींमध्ये स्त्रियांसाठी सवलत असते.

अशी टर्म इन्शुरन्स पॉलिसी कोणी घ्य ावी?

तुम्हाला भाववाढीची चिंता असेल आणि तुम्ही सापेक्षतेने तरुण वयात, उदाहरणार्थ लग्नांनंतर लगेचच, पॉलिसी खरेदी करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य असू शकेल. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की वाढलेल्या विमा रकमेसाठी तुमचा प्रिमियमचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे, म्हणून हा वाढलेला खर्च तुम्हांला झेपू शकेल याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. योग्य विमा सल्लगाराशी बोलून अशा प्रकारच्या पॉलिसीचे सर्व तपशील जाणून घेणे आणि चढत्या श्रेणीची टर्म अॅश्युरन्स पॉलिसी तुमच्या परिस्थितीसाठी खरोखरच सवोर्त्तम पॉलिसी ठरेल का, याची चर्चा करणे श्रेयस्कर ठरेल.

भाववाढीची गणती अंतर्भूत असलेली नावीन्यपूर्ण पॉलिसी खरेदी करणे ही काळाची गरज असली तरी हेसुद्धा महत्त्वाचे आहे की दावापूतीर्ची कार्यक्षम सेवा देणाऱ्या कंपनीची निवड करणे. दाव्यांसंबधीची कामगिरी हे विमा कंपनीच्या कामगिरीचे एक महत्त्वाचे मोजमाप आहेे. दावा हाताळणाऱ्या प्रक्रियांसंदर्भात पुरेसे नियंत्रणात्मक शासन आहे आणि कंपन्यांना पाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. यामुळे ग्राहकांना ही माहिती प्राप्त करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे सोपे जाते.

योजनेची योग्य निवड केल्यास महागाईवर मात करण्यात मदत होईल.