Thursday, 12 April 2018

Gopal Gadgil LIC Agent:
*तत्वनिष्ठ*

"अहो ऐकलंत का?राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"
" का राहूलने नेला नाही डबा?"शरदरावांनी विचारलं.
"अहो आज कुळधर्माचा साग्रसंगीत स्वयंपाक.तो इतक्या सकाळी कसा होणार?आणि आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येताहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत"
"ठिक आहे.देतो मी नेऊन"
शरदरावांनी हातातला पेपर बाजुला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.
पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता.वाद कसला,राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याचं बाजू घेणं.विषयही तोच "वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही"
"आई माझ्या मित्राचे वडिलही शिक्षक होते पण किती मोठा बंगला बांधलाय बघ.नाहीतर नाना!अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवताहेत"
राहूल तावातावाने बोलत होता.
"राहूल तुला माहीतेय की नाना घरात मोठे.त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली.शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली.आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरु होत्या.अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या.कुणी पार पाडल्या त्या?"
 "काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहिण बंगल्यात रहाताहेत.कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खातांना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"
क्षणभर पुष्पाबाईंना काय बोलावं ते सुचलं नाही.मग म्हणाल्या
"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं.भावाबहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही"
"बरं ते ठिक आहे.हजारो मुलांच्या त्यांनी ट्युशन्स घेतल्या.त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते.आजकालचे क्लासवाले पहा.इंपोर्टेड गाड्यात फिरतात."
"हे तू बरोबर म्हणतोहेस.पण नानांचं तत्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून.या त्यांच्या तत्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते.किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"
ते ऐकताच राहूल एकदम संतापला.
"काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई?त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं?पडलेहेत धुळ खात!कोणी विचारत नाही त्यांना"
तेवढ्यात दार वाजलं.राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते.वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भितीने राहूलचा चेहरा उतरला पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.
     
      शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले.सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती.कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.
"राहूल देशपांडेंना डबा द्यायचा होता.जाऊ का आत?"
"आता नाही देता येणार"गार्ड म्हणाला"चेअरमनसाहेब आलेत.त्यांच्यासोबत मिटींग सुरु आहे.कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील.तुम्ही बाजूला थांबा.चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको"
शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले.आजुबाजुला कुठेही सावली नव्हती.
थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला.पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला.बहूदा मिटींग संपली असावी.चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला.उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसताबसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं.गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.
"ते समोर कोण उभे आहेत?"त्यांनी सिक्युरिटी ला विचारलं
"आपल्या देशपांडे साहेबांचे वडिल आहेत.जेवणाचा डबा द्यायला आलेत"सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.
"बोलवा त्यांना"
नको ते घडलं होतं.राहुलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या.संताप आणि भितीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.
सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले.चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.
"तुम्ही देशपांडे सर का?डि.एन.हायस्कुलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"
"हो.तुम्ही कसं ओळखता मला?"
काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले.सगळे अधिकारी आणि राहूलही ते द्रुश्य पाहून अवाक झाले.
"सर मी अमित अग्रवाल.तुमचा विद्यार्थी होतो.बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात"
"हो हो.आठवलं.बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही"
चेअरमन हसले.मग म्हणाले
" सर तुम्ही इथे उन्हात काय करताय?चला आतमध्ये बसू.खुप गप्पा मारायच्यात तुमच्याशी.सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?" सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.ते पाहून शरदरावच म्हणाले
"त्यांची काही चुक नाही.तुमची मिटींग चालू होती.तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो"
"ओके ओके"
चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले.
"बसा सर"आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.
"नाही नाही ती खुर्ची तुमची आहे"शरदराव गडबडून म्हणाले.
"स

1 comment:

  1. नमस्कार सर, ही सदर कथा आपण लिहलेली आहे का ?
    आपल्या उत्तरेच्या प्रतीक्षेत

    ReplyDelete